वाण्याचीवाडी, ता. कराड येथून ७ हजार रुपये किमतीची शेळी चोरून नेल्याप्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बोरखळ, ता. सातारा येथील एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच ७ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कदमआवाड (मंद्रूळकोळे) ता. पाटण येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सरकार ही जनतेची आस्था असलेली एलआयसी खाजगी हातात सोपवत आहे. मात्र विमा कर्मचारी संघटना जनतेच्या साथीने हा प्रयत्न हाणून पडणार आहे, असे ठाम प्रतिपादन अखिल भारतीय विमा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कॉ. श्रीकांत मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केले.
गेल्या दहा वर्षापासून मी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांसाठी संघर्ष केला. माझे काम व निष्ठा पाहून पक्षाने कोरेगाव आणि माण विधानसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर दिली असून भविष्यात पाणी प्रश्न, औद्योगिक वसाहतीसाठी लढा उभारणार, अशी ग्वाही शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात तीन दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ३ हजार ६४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
फ्लॅट विकत घेण्यासाठी कर्ज घेऊन तो एका फायनान्स कंपनीकडून निल केल्याचा बनावट दाखला तयार करून त्याची परस्पर विक्री करून २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संगममाहुली, ता. सातारा येथील एका दाम्पत्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाकनवाडी, ता. वाई येथे विहिरीत बुडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.