कदमआवाड (मंद्रूळकोळे) ता. पाटण येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : कदमआवाड (मंद्रूळकोळे) ता. पाटण येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ ऑगस्ट २०२२ ते दि. ९ सप्टेंबर २०२२ दरम्यान कदम आवाड, (मंद्रूळकोळे) येथील प्रमोद पांडुरंग कदम वय ४६ यांच्या घराचा कोंयडा तोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून पाण्याची मोटर, सिलेंडर टाकी, पाणी तापवण्याचा बंब, ट्रॅक्टरची बॅटरी व अन्य साहित्य असा एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


