maharashtra

मारहाण प्रकरणी बोरखळ येथील सात जणांवर गुन्हे


बोरखळ, ता. सातारा येथील एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच ७ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : बोरखळ, ता. सातारा येथील एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच ७ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० रोजी १० वाजण्याच्या सुमारास बोरखळ येथे प्रतीक्षा आकाश नलवडे वय २१ हिने आकाश नलावडे यांच्याशी प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून प्रज्वल प्रकाश रसाळ याने आकाश नलावडे याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रतीक्षा नलवडे व तिच्या कुटुंबातील सदस्य भांडणे सोडवण्यासाठी आले असता प्रज्वल रसाळ याने प्रतिक्षा हिची सासू संगीता यांचा वायरने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. विक्रांत तानाजी रसाळ याने संजय नलवडे यांना खाली ढकलले. याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलिसांनी प्रज्वल प्रकाश रसाळ,  विक्रांत तानाजी रसाळ, प्रकाश विठ्ठल रसाळ, अर्चना प्रकाश रसाळ,  तानाजी विठ्ठल रसाळ, संगीता तानाजी रसाळ, सिंधू विठ्ठल रसाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.