फ्लॅट विकत घेण्यासाठी कर्ज घेऊन तो एका फायनान्स कंपनीकडून निल केल्याचा बनावट दाखला तयार करून त्याची परस्पर विक्री करून २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संगममाहुली, ता. सातारा येथील एका दाम्पत्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : फ्लॅट विकत घेण्यासाठी कर्ज घेऊन तो एका फायनान्स कंपनीकडून निल केल्याचा बनावट दाखला तयार करून त्याची परस्पर विक्री करून २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संगममाहुली, ता. सातारा येथील एका दाम्पत्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगम माहुली, ता. सातारा येथील योगेश बबन साठे, रेखा योगेश साठे यांनी फ्लॅट विकत घेण्यासाठी कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे काही हप्ते न फेडता तो फ्लॅट शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स लिमिटेड या कंपनीकडून निल केल्याचा बनावट दाखला तयार करून तो फ्लॅट परस्पर विकून टाकला. याप्रकरणी नाझीम मुसा शेख रा. शनिवार पेठ, गुरुवार बागेसमोर, सातारा यांनी साठे दाम्पत्याने २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


