maharashtra

सज्जनगड येथून एकजण बेपत्ता


सज्जनगड, ता. सातारा येथील गडावरून एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सज्जनगड, ता. सातारा येथील गडावरून एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, दि. २ ऑगस्ट २०२२ रोजी सज्जनगड येथील श्री रामदास मंदिर येथून अभिजीत चंद्रशेखर कुलकर्णी वय ६२, मूळ रा. चिकोडी, ता. चिकोडी, जि.  बेळगाव  हे कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत ते अद्याप परत न आल्याची तक्रार बाळकृष्ण राजाराम इनामदार, राहणार सुंदर संकुल सोसायटी, मगरपट्टा रोड, हडपसर, पुणे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.