जिल्ह्यात तीन दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ३ हजार ६४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
सातारा : जिल्ह्यात तीन दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ३ हजार ६४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत एका घराच्या आडोशाला तेथीलच चंद्रकांत विठ्ठल साबळे वय ५० याच्याकडून ८४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २२ बाटल्या हस्तगत केल्या. त्याच परिसरात शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे आडोशाला तेथीलच विठ्ठल मारुती यादव वय ३२ याच्याकडून १ हजार ५४० रुपये किमतीच्या २२ देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. तिसऱ्या घटनेत चोरजवडा, ता. खटाव येथे राहत्या घराच्या यांवर छापेआडोशाला तेथीलच विजय शंकर हर्णे वय २५ याच्याकडून १ हजार २६० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.


