दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
सातारा : दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गजानन नारायण पोळ वय ६५, रा. ओझर्डे, ता. वाई यांनी दि.७ रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास ओझर्डे येथे राहत्या घरी दारूच्या नशेत विषारी औषध पिल्याने त्यांना प्रथम वाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना दि.८ रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. प्रतीक गावडे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे.


