जुन्या भांडणाच्या कारणातून एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किंबहुना ज्यांच्या नावामुळे सातारा हे नाव पडले, त्या अजिंक्यतारा किल्ल्याची प्रतिकृती तयार करून मुस्लिम समाजातील बालगोपाळांनी खऱ्या अर्थाने सर्व धर्मीय समभावाचीच दिवाळी साजरी केली आहे.
चरेगाव, ता.कराड गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
जिल्ह्यातील पारगाव, खंडाळा, शिरवळ, भुईज, वाई, उंब्रज या भागात के.टी.एम. मोटार सायकलवरून येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. 5 जणांना अटक करून तब्बल 103 तोळे सोने, 50 किलो चांदी जप्त केली.
येथील नाकींदा, क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर अज्ञातांनी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे याठिकाणी येणार्या पर्यटकांना दुर्गंधीमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासही त्रास होत असल्याने स्वच्छ महाबळेश्वर म्हणवून घेणार्या महाबळेश्वर पालिका मुख्याधिकार्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
दुचाकीवरुन पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
वडूथ येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
भाजी मंडईतून अज्ञात चोरट्याने मोबाईलची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या परिमंडळांमध्ये केवळ कर्जांचे पुनर्गठन न करता शेतकऱ्यांना कर्जमाफीसह त्यांच्या शेती कर्ज वसुलीस स्थगिती देण्याची मागणी किसान सभेच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे.