maharashtra

भटके विमुक्त शिक्षण विकास संस्थेचे साताऱ्यात आंदोलन


राज्यातील १६५ शाहू, फुले, आंबेडकर निवासी आश्रमशाळा योजनेच्या शाळांचे थकीत वेतन व परिपोषण अनुदान तात्काळ मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र भटके विमुक्त शिक्षण विकास संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

सातारा : राज्यातील १६५ शाहू, फुले, आंबेडकर निवासी आश्रमशाळा योजनेच्या शाळांचे थकीत वेतन व परिपोषण अनुदान तात्काळ मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र भटके विमुक्त शिक्षण विकास संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
भारतीय घटनेनुसार अनुसूचित जातीच्या कोणत्याही निवासी आश्रमशाळांना किंवा अल्पसंख्यांक शाळांना ६ महिन्याच्या आत अनुदान देण्याची तरतूद असताना २००१ पासूनते २०२३ पर्यंत कोणत्याही प्रतीचे अनुदान अदा करण्यात आले नाही. सदर शाळा या निवासी शाळा असून मुलांचे पालन पोषण, भोजन, गणवेश, वैद्यकीय खर्च व शिक्षण आदी अनेक वर्षांपासून खर्च करत आहेत. ८ मार्च २०१९ मध्ये शासन निर्णयानुसार २० टक्के अनुदानास जिल्हयातील ६ आश्रमशाळा व राज्यातील १५९ अशा एकूण १६५ आश्रमशाळा अनुदानास पात्र झाल्या असून अद्याप त्यांना एकही रुपया मिळालेला नाही. त्यांना तात्काळ अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.