एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मतकर कॉलनी, सातारा येथील त्रिमूर्ती बार जवळ यश दीपक शिंदे रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, सातारा याला बियरच्या रिकाम्या बाटल्या, दगड आणि हाताने मारहाण केल्याप्रकरणी सोमनाथ आवारे रा. कोंडवे, ता. सातारा, रोहन थोरात रा. मतकर कॉलनी सातारा, श्रवण पवार आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर करीत आहेत.


