maharashtra

दलित महासंघाचे साताऱ्यात आंदोलन


पारधी समाजासाठी असलेली पारधी आवास योजना तात्काळ सुरु करावी यासह अन्य मागण्यांसाठी पारधी हक्क अभियान व दलित महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.

सातारा : पारधी समाजासाठी असलेली पारधी आवास योजना तात्काळ सुरु करावी यासह अन्य मागण्यांसाठी पारधी हक्क अभियान व दलित महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.
पारधी समाजासाठी असलेली पारधी आवास योजना, जातीचे दाखले, रेशनिंग कार्ड त्याचबरोबर पारधी समाजासाठी असलेले घोडेगाव येथील विकास महामंडळ याचे कार्यालय साताऱ्यात सुरु करावे या मागण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पारधी समाजाचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार व निवेदन दिली असून पारधी समाजाच्या मागण्याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. तरी आपण पारधी समाजाच्या मागण्याबाबत गांभीर्याने विचार करावा अन्यथा सोमवार दि. २० नोव्हेंबर रोजी अर्ध नग्न मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष उमेश चव्हाण, सुधाकर वायदंडे, डॉ. रमाकांत साठे, नम्या राज भोसले, अंबर शेख भोसले, खुदास भोसले, भाईज्या नितीन भोसले, उतेकर शिंदे, अरुणा भोसले, रुपिता पवार, रोजा भोसले उपस्थित होते.