maharashtra

राहत्या घरातून मोबाईलची चोरी


राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने मोबाईलची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने मोबाईलची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वसीम फारुख अन्सारी रा. शाहूनगर, सातारा यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने त्यांचा 13 हजार रुपये किंमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.