maharashtra

आपआपसात मारहाण प्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा


आपआपसात मारहाण केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सातारा : आपआपसात मारहाण केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात पाच जणांनी पोलिसांसमोरच धक्काबुक्की, शिवीगाळ करत आपआपसात मारहाण केली. ही घटना दि. 15 नोव्हेबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात महिला पोलिसाने तक्रार दिली आहे. रतन लक्ष्मण आवळे, रवींद्र आवळे (सर्व रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांच्यासह तीन महिलांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.