महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार

कोल्हापूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार दिनांक 29 रोजी सैदापूर कराड येथे सभा होत असून या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सैदापूर येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला 

आधी धरण नंतर पुनर्वसन ही लोकप्रतिनिधींची भूमिका होती. मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून धरणांची कामे करत असताना धरणाचे काम आणि पुनर्वसन एकाच वेळी सुरू राहिले पाहिजे, अशी मी भूमिका घेतली. त्यानंतर सध्याचा पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण

महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे देशासाठी असलेले अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी मानसपुत्राने केंद्र सरकारकडे शिफारस का केली नाही, असा सवाल महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले

वाई तालुक्यातील खंडाळा आणि भुईंज या दोन्ही किसन वीर सहकारी साखर कारखान्यांच्या भवितव्यासाठी मी आमदार मकरंद पाटलांना लागेल ती मदत करायला तयार असून त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहीन, असा विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. 

esahas.com
महाराष्ट्र

कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं

सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधीच्या आयकर नोटीसा बजावल्या, तेव्हा महाराष्ट्रातील कथीत थोर नेते सत्तेवर होते. आयकराच्या बोजातून त्यांनी कारखान्यांना का बाहेर काढले नाही? ही जनता वाडगं घेऊन आपल्या मागे मागे फिरली पाहिजे, अशी त्यांची भावना होती.

esahas.com
महाराष्ट्र

विरोधकांनी सत्तेचे स्वप्न बघणं सोडून द्यावं!

केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या सरकारने लोककल्याणाची कामे बारकाईने केली. लोक कामाकडे बघून  मते देतात. निष्क्रिय विरोधकांना मते मागण्याचा अधिकारच राहिला नसून त्यांनी सत्तेचे स्वप्न सोडून द्यावं, असा सल्ला महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

esahas.com
महाराष्ट्र

पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले

पाटण मतदारसंघाचे कार्यकुशल नेतृत्व शंभूराज देसाई यांनी विकास कामांचा विडा उचलला आहे. सर्वांनी एकीने काम करूया, विभागाला निधी कधी कमी पडू देणार नाही,असा ठाम निर्धार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

esahas.com
महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी मोदींकडे करणार

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com
महाराष्ट्र

खोर्‍याने मते घेणार्‍या नेत्यांनी केले पाटण खोर्‍याकडे दुर्लक्ष

कॉंग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोर्‍याने मते मिळवली. परंतु पाटण खोर्‍यातील जनतेकडे साफ दुर्लक्ष केले, अशी टीका महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच देशाची उन्नती साधणार्‍या भाजप सरकारला सत्ता देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा

सातार्‍याची छत्रपती शिवरायांची गादी महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा सन्मान आहे. हा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी छत्रपतींचे वंशज असणार्‍या खासदार उदयनराजे भोसले यांना मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.