maharashtra

धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहीर पाठिंबा


सातारा लोकसभा मतदार संघातील समस्त धनगर समाजाच्या वतीने, दि. 7 मे रोजी होणा-या निवडणुकीत, सातारा जिल्हयाचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नेते आणि भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठींबा महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीने घोषित केला आहे.

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघातील समस्त धनगर समाजाच्या वतीने, दि. 7 मे रोजी होणा-या निवडणुकीत, सातारा जिल्हयाचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नेते आणि भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठींबा महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीने घोषित केला आहे.
धनगर समाज ऐतिहासिक काळापासून स्वराज्याशी एकनिष्ठ राहीला आहे. धनगर समाज पूर्वीपासून प्रामाणिक आणि समाजामध्ये मिळुन मिसळुन राहणारा म्हणून ओळखला जातो. आत्ताच्या आधुनिक काळात प्रगतीकडे  झेपावत असलेल्या धनगर समाजाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रमुख आधारस्तंभ आहेत. समाजाचे कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी प्रगल्भता आणि जिगर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची,  राजकारण किंवा समाजकारण करण्याची पारदर्शी रित असल्याने, सातारा लोकसभा मतदार संघातील सर्व धनगर समाजाचा एकमुखी पाठींबा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना समाजाच्या विविध बैठकांमधुन व्यक्त करण्यात आला असल्याने, समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी धनगर समाज संघर्ष समिती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठींबा घोषित करीत आहे असे समितीच्या वतीने गणेश वळकुंदे आणि हिंदूराव हाके यांनी समितीच्या सदस्यांसमवेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना समक्ष भेटून अभिवचन आज दिले आहे.
पुण्यशील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजातील सर्व स्तरातील घटकांना लोककल्याणकारी कामांमधुन नेहमीच समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनीच अत्युच्य  शिवोपासनेचा आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे. होळकर घराण्यापासून धनगर समाजाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. या पार्श्वभुमीवर धनगर समाज संघर्ष समितीने समस्त धनगर समाजाच्या वतीने आम्हाला दिलेल्या आपुलकीच्या पाठींब्याबाबत आम्ही आभारी आहोत, अठरा पगड जाती आणि सर्वधर्म पंथांतील व्यक्तींकरीता, माणुसकीला सर्वोच्य प्राधान्य देत सर्वधर्म समभावाच्या नीतीतत्वावर आपण येथुन पुढे अधिक जोमाने कार्य करीत राहू. आमच्या समाजकार्याला समस्त धनगर समाज बंधु-भगिनींनी  दिलेल्या पाठींब्यामुळे आम्हा निश्चित बळ मिळाले आहे अशा शब्दात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.