महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

ज्येष्ठ नेत्यांकडून घोटाळ्याचे रोपटे साताऱ्यात लावण्याचा प्रयत्न सुरू 

लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, "महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याचे माझ्यावर खूपच प्रेम आहे. मला विरोध करण्यासाठी ते जिल्ह्यात चार सभा घेणार आहेत."

esahas.com
महाराष्ट्र

दलित महासंघ, पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा 

दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुती मित्रपक्ष व भाजपचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाठिंबा जाहीर केला.

esahas.com
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी

सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारासाठी दिनांक 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सैदापूर येथे शेतकी मैदानावर सभा होत आहे. ही सभा यशस्वी करून या सभेतूनच उदयनराजे यांच्या विजयाची नांदी होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

esahas.com
महाराष्ट्र

वाट कशाची पाहता? कामाला लागा

नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची ज्या पद्धतीने आधीच तयारी करता, तशीच तयारी करून वाट न पाहता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी व भाजपच्या आजी माजी पदाधिकार्‍यांना केल्या.

esahas.com
महाराष्ट्र

उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन

खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई शहरात प्रचार फेरी काढण्यापूर्वी घाटावरील महागणपतीचे दर्शन घेतले. 

esahas.com
महाराष्ट्र

लोटांगण घालणाऱ्या सोंगाड्यांना भूलू नका

देशाला पुन्हा अधोगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्र पक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्यापुढे लोटांगण घालतील, अशा सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका, असे जाहीर आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 30 एप्रिल रोजी ता. कराड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या जागेची पाहणी उदयनराजे भोसले यांनी केली.

esahas.com
महाराष्ट्र

उदयनराजेंना विक्रमी मतदाधिक्क्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांना राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक विक्रमी मतदाधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा ‘आप’ने राबविलेला उपक्रम प्रेरणादायक : मनिष लाहोटी

आम आदमी पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आम आदमी पार्टी करंजे कार्यालयात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी सातारा नगरपालिकेतील ज्येष्ठ सफाई कामगार महिलांना साडी, नारळ व आम आदमी पक्षाचे चिन्ह झाडू देऊन त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.  मनिष लाहोटी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी लाहोटी म्हणाले, आम आदमी पक्षाने राबविलेला हा उपक्रम निश्‍चित स्तुत्य आहे. सातारा जिल्हा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कामासाठी झटताना दिसत असतात. समाजाभिमुख राबविलेला हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

esahas.com
महाराष्ट्र

महामार्गावर कारवाईत 25 लाखांचा गुटख्यासह दोघे ताब्यात

कारला कट मारणे पडले महागात, गुटख्याची झाली पोलखोल.. सातार्‍यातील सामाजिक कार्यकर्ते सरदार उर्फ सागर भोगावकर तसेच त्यांच्या सोबत मारूती जानकर ,निवृत्ती शिंदे व रतन पाटील हे हुंदाई कारने सातार्‍याला येत होते. त्याच वेळी या घटनेतील टेंपो चालकाने त्यांच्या कारला कट मारला. पुढे भोगावकरांनी गाडी अडवुन चालकाला विचारणा केली. त्याच दरम्यान त्यांना टेंपोतील मालाबाबत संशय आला. याची विचारणाही त्यांनी चालकास केली. त्यावेळी त्याने गुटखा असल्याचे सांगितले . त्यांनी तात्काळ जागरूकता दाखवुन एस. पी. समीर शेख यांना कळविल्यानेच एवढया मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतुक उघडकीस आली.