सातार्याची छत्रपती शिवरायांची गादी महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा सन्मान आहे. हा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी छत्रपतींचे वंशज असणार्या खासदार उदयनराजे भोसले यांना मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.
लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, "महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याचे माझ्यावर खूपच प्रेम आहे. मला विरोध करण्यासाठी ते जिल्ह्यात चार सभा घेणार आहेत."
दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुती मित्रपक्ष व भाजपचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाठिंबा जाहीर केला.
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारासाठी दिनांक 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सैदापूर येथे शेतकी मैदानावर सभा होत आहे. ही सभा यशस्वी करून या सभेतूनच उदयनराजे यांच्या विजयाची नांदी होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची ज्या पद्धतीने आधीच तयारी करता, तशीच तयारी करून वाट न पाहता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी व भाजपच्या आजी माजी पदाधिकार्यांना केल्या.
खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई शहरात प्रचार फेरी काढण्यापूर्वी घाटावरील महागणपतीचे दर्शन घेतले.
देशाला पुन्हा अधोगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्र पक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्यापुढे लोटांगण घालतील, अशा सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका, असे जाहीर आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 30 एप्रिल रोजी ता. कराड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या जागेची पाहणी उदयनराजे भोसले यांनी केली.
सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांना राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक विक्रमी मतदाधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केला आहे.
आम आदमी पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आम आदमी पार्टी करंजे कार्यालयात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी सातारा नगरपालिकेतील ज्येष्ठ सफाई कामगार महिलांना साडी, नारळ व आम आदमी पक्षाचे चिन्ह झाडू देऊन त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. मनिष लाहोटी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी लाहोटी म्हणाले, आम आदमी पक्षाने राबविलेला हा उपक्रम निश्चित स्तुत्य आहे. सातारा जिल्हा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कामासाठी झटताना दिसत असतात. समाजाभिमुख राबविलेला हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा आहे.