maharashtra

सातारा ‘आप’ने राबविलेला उपक्रम प्रेरणादायक : मनिष लाहोटी

आम आदमी पक्षाच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीनेही प्रजासत्ताक दिन आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा

Activities implemented by Satara 'AAP' are inspiring: Manish Lahoti
आम आदमी पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आम आदमी पार्टी करंजे कार्यालयात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी सातारा नगरपालिकेतील ज्येष्ठ सफाई कामगार महिलांना साडी, नारळ व आम आदमी पक्षाचे चिन्ह झाडू देऊन त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.  मनिष लाहोटी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी लाहोटी म्हणाले, आम आदमी पक्षाने राबविलेला हा उपक्रम निश्‍चित स्तुत्य आहे. सातारा जिल्हा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कामासाठी झटताना दिसत असतात. समाजाभिमुख राबविलेला हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

देशाचा प्रजासत्ताक दिन वेगवेगळ्या स्वरुपात साजरा होत असताना सातारा जिल्हा आम आदमी पक्षातर्फे एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवून हा दिन साजरा करण्यात आला. आम आदमी पक्षाच्या या उपक्रमाचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
राज्यासह देशात महागाई वाढली असताना त्यानुषंगाने सामान्य नागरिक बेहाल झाला आहे. राज्यात वीज माफीचा प्रश्‍न ऐरणीवर आणणार्‍या आम आदमी पक्षाच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीनेही प्रजासत्ताक दिन आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा केला.
आम आदमी पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आम आदमी पार्टी करंजे कार्यालयात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी सातारा नगरपालिकेतील ज्येष्ठ सफाई कामगार महिलांना साडी, नारळ व आम आदमी पक्षाचे चिन्ह झाडू देऊन त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. 
मनिष लाहोटी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी लाहोटी म्हणाले, आम आदमी पक्षाने राबविलेला हा उपक्रम निश्‍चित स्तुत्य आहे. सातारा जिल्हा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कामासाठी झटताना दिसत असतात. समाजाभिमुख राबविलेला हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा आहे. यावेळी लाहोटी यांनी आम आदमी पक्षाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
सातारा जिल्हा समन्वयक सरदार (सागर) भोगावकर म्हणाले, देशात महागाई वाढली असताना केंद्राला सर्वसामान्यांचे काहीही सोयरसुतक नाही. सामान्य माणूस गरीबीने पिचलेला असताना सत्ताधार्‍यांना विविध उद्घटनांमधून वेळ मिळत नाही. स्वत:ची टिमकी वाजवून घेणार्‍या भाजप ने सामान्यांच्या हालअपेष्टा बघणे गरजेचे असतानाही त्यांचे लक्ष नाही. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून आल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून आम आदमी पार्टी वेगाने राज्यात विस्तारत आहे. आगामी काळात याचा दणका भाजपला नक्कीच बसणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील, जिल्हा सचिव निवृत्ती शिंदे, जिल्हा संघटक ऍड.धीरज जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अब्बास भाई, तुषार जाधव, सातारा शहराध्यक्ष सयाजी पाटील, शारदा लाहोटी, फारुख मुजावर, सौ. सावली भोगांवकर, ऍड. प्रशांत कांबळे, श्रीपतराव पाटील हायस्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच करंजे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.