आपलं चिन्ह कमळ आहे. आता घड्याळाची वेळ चांगली नाही. आता इकडे तिकडे बघू नका. हातातले घड्याळ वेगळं आहे असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीवर टीका केली.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सांगितले होते की 12 ते 17 जून दरम्यान एअर इंडियाने बोईंग 787 विमानांसह 66 उड्डाणे रद्द केली.
आम आदमी पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आम आदमी पार्टी करंजे कार्यालयात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी सातारा नगरपालिकेतील ज्येष्ठ सफाई कामगार महिलांना साडी, नारळ व आम आदमी पक्षाचे चिन्ह झाडू देऊन त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. मनिष लाहोटी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी लाहोटी म्हणाले, आम आदमी पक्षाने राबविलेला हा उपक्रम निश्चित स्तुत्य आहे. सातारा जिल्हा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कामासाठी झटताना दिसत असतात. समाजाभिमुख राबविलेला हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
आपआपसात मारहाण केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. इतर तालुक्यात स्थानिक आमदारांनीही आपले गड राखले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्रातील ललित पाटील ड्रग्स प्रकरणातील नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेश सदस्य तुषार मोतलिंग यांनी केली आहे.
या सोहळ्यात विद्यापीठातील ९६१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १३ जणांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि ट्रामा सेंटर, फलटणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन चे आयोजन बुधवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वा. सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शेतीअवजारे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. उद्या आपण घेणाऱ्या प्रत्येक श्वासावरही जीएसटी लागल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसाहेब हेच का आपले अच्छे दिन ! असा थेट सवाल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र वजा निवेदनाद्वारे केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना अनेक पदे दिली. मात्र त्या पदांचे जे वाढीव अधिकार होते ते आम्हाला दुर्दैवाने मिळाले नाहीत. त्यामुळे सभेचे कामकाज चालवणे आणि विकास कामांच्या प्रस्तावाची शिफारस करणे इतकेच नामधारी काम आमच्या हातात उरले होते, अशी खंत बंडखोर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट गुवाहाटी येथून व्यक्त केली.
विद्यार्थी वर्गाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडावे. आपला कल पाहून शाखा निवडावी. केवळ आपल्या जवळच्या मित्राने एखादी शाखा निवडली म्हणून आपण ती शाखा निवडू नये. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. करीअर च्या अनेक वाटा आहेत. आपल्याला जी योग्य वाटते ती वाट आपण निवडावी.
झाडे ही निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली देणगी आहे. म्हणूनच निसर्गातील सर्व झाडांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य समजायला हवे. असे मत रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील डोंगरी भागात जास्त पाऊस होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर शाळांमध्ये करा. याबरोबरच सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मराठा साम्राज्याच्या इतिहासात महाराणी येसूबाई हे त्याग आणि संयम याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. मातृत्व आणि कर्तुत्व यांचा मनोहारी संगम असणाऱ्या लढवय्या महाराणी येसूबाई यांनी इतिहासामध्ये त्यांच्य धीरोदात्त स्वभावाचे दर्शन घडवले. मात्र इतिहासाने त्यांच्या कर्तृत्वाची म्हणावी तशी दखल घेतली नाही हे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यात आपणच कुठेतरी कमी पडलो, असे प्रतिपादन सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
सातारा: सातारा शहरातील पोवई नाका परिसरात असलेल्या शासकीय गोदामाचे दुरुस्तीचे काम दोन महिन्यापूर्वी करण्यात आले. पहिल्याच अवकाळी पावसात या इमारतीवरील दुरुस्ती करण्यात आलेले पत्रे उडून गेले. त्यामुळे गोदामातील धान्याचे नुकसान झाले असून अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा जनहितार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार सागर भोगावकर यांनी दिला आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बहुतेक लोकांना आरोग्यासाठी खूप काही करायला वेळ नसतो. म्हणून चालणं हा त्यांच्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. कारण यासाठी तुम्हाला तुमच्या रुटीनपेक्षा वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वाहन वापरण्याऐवजी तुम्ही चालत जाऊन तुमच्या कॅलरीज बर्न करू शकता. चालणं हा तसा सर्वात सोपा आणि चांगला व्यायाम प्रकार आहे आणि त्याचे अनेक फायदे (Benefits of walking) देखील आहेत.
महिलांनी आपल्या खंबीर मानसिकतेचा नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परिचय दिला आहे त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःचा विकास साधला पाहिजे, एवढेच नव्हे तर आपल्या कर्तुत्वाने नवीन मापदंड निर्माण करायला हवेत. यामध्ये त्या कुठेच कमी पडणार नाहीत, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी व्यक्त केली.
आपणाला जो प्रश्न समाजापुढे मांडायचा व सांगायचा आहे तो शब्दात सांगणं खूप सोप्प परंतु पडद्यावर दाखवन तितकंच अवघड हे अवघड काम नागराज ने फॅन्ड्री ,सैराट, नाळ नंतर थेट बॉलिवूडमधील झुंड मध्ये करून दाखवले आहे.
"संतान जन्माला येणे सोपं आहे. पण त्यांच्यावर संस्कार करणं अवघड आहे. जोपर्यंत संतान हाताच्या आणि हाकेच्या अंतरावर आहे. तो पर्यंत ती सुधारु शकते. नाहीतर ती हाताबाहेर जाते." असा संदेश देणारा "आप्पा काळजी घ्या" या लघु चित्रपटाचे नुकतेच जळगाव येथील देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन झाले.
जाणुन घ्या लाईट बिला संबंधित तुमचे अधिकार; अन्यथा तुमची अशीच लूट होईल..! वीज ही आपली गरज आहे आणि ती आपण त्यानुसार वापरतो. तसेच आपण त्याचे बिलही भरतो. गेल्या काही दिवसांपासून लाईटबिल भरपूर आले आहे. लाइटबिल चे रीडिंग कमी असले आणि तुम्ही वापरत असलेले युनिट देखील कमी असले तरीही, लाइटबिल हे जास्त उकळले जाते आणि याला आपणच जबाबदार देखील आहोत.
निसर्गामध्ये आपल्याला जसा जगण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार वन्य प्राण्यांना आहे. माणसाला स्वार्थी समजले जाते. इथेही आपला स्वार्थ पहा. आपल्याला निसर्गात जगायचे असेल तर वन्य प्राण्यांनाही जगवा. बिबट्याला दुखवू नका मात्र त्याच्यापासून स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन सातारा तालुका वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले.
आ. शशिकांत शिंदे हे माझे सहकारी आहेत. परंतु, जिल्हा बँक निवडणूकीच्या राजकारणात नेमके काय घडले? हे मला माहित नाही. मी त्या प्रचार प्रक्रियेत नव्हतो. मात्र, आपण दुसऱ्यासाठी जेव्हा खड्डा खणतो, तेव्हा कधीतरी आपणही त्याच खड्ड्यात पडतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशी बोचरी टीका माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर केली.
पाटण तालुका आरोग्याच्या बाबतीत इतका मागास कसा राहिला? एक व्हँटिंलेटरचे अद्यावत हॉस्पिटल या तालुक्यात नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याच जाणिवेतून पाटण ला तहसिलदार म्हणून रुजू झाल्यानंतर कोरोना रुग्णानां कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांनी आपला एक महिन्याचा पगार कोविड रुग्णांसाठी दिला. या गोष्टीमुळे पाटणवासीयांनी त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात घराला स्वच्छ ठेवणे अवघड असते. वेळेच्या अभावामुळे घराला स्वच्छ ठेवू शकत नाही. फक्त रविवारचा दिवसच आपण घर स्वच्छ करण्यासाठी देतो अशा परिस्थितीत काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपण दररोज पण काम करता करता घर स्वच्छ करू शकता.
‘मराठी भाषेचे आपल्यावर अनंत उपकार असून, या भाषेमुळेच अकरा कोटी मराठी जनतेला जीवनाचा आनंद घेता येत आहे, हजारो वर्षांपासून मराठी भाषेने आपली ज्ञान परंपरा जपली आहे. या भाषेचा गौरव, रक्षण व जतन करणे, हे आपले परम कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
‘स्नेह आपुलकीची भावना तेथेच खर्या अर्थाने जिव्हाळाचे नाते समृद्ध होते,’ असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.
‘कोरोनाची भीती सर्वांनाच लागलेली आहे. साथीच्या रोगांवर आपण जसे घरगुती उपाय किंवा दवाखान्यातून एखादे इंजेक्शन घेऊन त्यावर उपाय करतो, त्याचप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून, आपण कोरोनावर मात करू शकतो. त्यामुळे कोरोनाबाबत असणारी मनातील भीती काढून, आपल्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोना व्हायरसशी लढत-लढत आपण जगायला शिका,’ असे प्रतिपादन विधान परीषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
वाठार प्रतिनिधी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तलाठी सचिन ढवण यांना सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा तर्फे प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते त्यांना नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले. तलाठी सचिन ढवण यांनी मालखेड व बेलवडे बुद्रुक येथे उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे. सध्या ते तांबवे येथे तलाठी म्हणून कार्यरत आह...