राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा
उदयनराजे भोसले यांना मोठे मताधिक्य देण्याचा पंडित राठोड यांचा शब्द
जिल्ह्यात राष्ट्रीय बंजारा परिषदेने महायुतीला जाहीर पाठींबा दिला. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळून देण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद प्रयत्न करेल, असा विश्वास राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. पंडित राठोड यांनी व्यक्त केला.
सातारा : जिल्ह्यात राष्ट्रीय बंजारा परिषदेने महायुतीला जाहीर पाठींबा दिला. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळून देण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद प्रयत्न करेल, असा विश्वास राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. पंडित राठोड यांनी व्यक्त केला.
समाजातर्फे उदयनराजे भोसले यांना भेटून जाहीर पाठींबा दिला आहे. सातारा जिल्ह्यात बंजारा समाजाचे पन्नास हजारहून अधिक मतदार असून राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पाठींब्यामुळे उदयनराजे यांचा विजय निश्चित होईल याची खात्री मानली जात आहे. यावेळी अॅड. पंडित राठोड, अनिल नाईक यांनी उदयनराजेना पाठिंब्याचे पत्र देऊन सन्मान केला.
उदयनराजे यांनी, मी बंजारा समाजाच्या सोबत असून गोरबोली भाषाला मान्यता प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिन असे सांगून गोर बंजारा समाजाला वेगवेगळ्या समिती स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये स्थान मिळून देऊ, तांड्या मध्ये विकासाची गंगा पोहचवू, असे आश्वासन उदयनराजे यांनी दिले.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय बंजारा परिषदची मोठी ताकत आहे. सातारा जिल्ह्यात बंजारोकी ललकार.. इस बार भी मोदी सरकार..अब की बार 400 पार.. में बंजारा मोदी हमारा.. हा नारा देऊन महाराष्ट्र दौरा करून अॅड. पंडित भाऊ राठोड महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी ताकतीने काम करत आहेत.
या वेळी प्रदेश प्रवक्ता अमोल पवार, कार्याध्यक्ष अनिल नाईक, ग्रामपंचायत सदस्य नामदेव राठोड, धर्मराज राठोड, शिवाजी राठोड, मोहन राठोड, नाना राठोड, सुनील चव्हाण, संदीप राठोड यांच्या सह सातारा लोकसभा मतदार संघातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


