वाघजाई वाडी येथे लम्पीग्रस्त गाईने दहशत निर्माण केली असून या गाईवर योग्य उपचार करण्याची मागणी वाघजाईवाडी येथील शेतकरी करीत आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सातार्यातील अॅड. कमलेश पिसाळ बिनविरोध निवडून आले असून सलग दुसर्यांदा त्यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे क्रीडाक्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
मदेव समाजोन्नती परिषद व जनश्री फाऊंडेशन म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने व मे. शुभम भारत गॅस एजन्सी यांच्या सहकार्यातून आयोजित भव्य रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील सर्व समाजातील तब्बल 161 रक्तदात्यांनी याप्रसंगी रक्तदान केले आहे.
अपघातात जखमी झालेल्या एकाचा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
येथील तहसीलदार कार्यालय परिसरातील एका पतसंस्थेसमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील गुरुवार बाग परिसरातून अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
जुन्या भांडणाच्या कारणातून क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे सोनगाव येथील एकाला मारहाण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
कराड- पाटण मार्गावर विहे घाटातील नहिंबे- चिंरबे गावच्या हद्दीत मारूती सुझूकी कंपनीची डीझायर गाडी रस्ता सोडून चक्क संरक्षक कठड्यावर चढली. या कठड्याच्या दुसऱ्या बाजूला 25 ते 30 फूट खोल भाग होता. परंतु ही गाडी या कठड्यावर जावून थांबली.
कराड शहर हद्दीतील गहाळ व चोरीस गेलेले 4 लाख रूपयांचे 25 मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
आज महाराष्ट्रात जी भाषा वापरली जाते, ती कोणत्या दर्जाची आहे याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे देश आणि परदेशात महाराष्ट्राबाबत कोणते चित्र जाते याचाही विचार झाला पाहिजे.