maharashtra

जिल्ह्यातील चार अल्पवयीनांचे अपहरण


जिल्ह्यातील चार अल्पवयीनांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यातील चार अल्पवयीनांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 7 जानेवारी रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास करंजे सातारा येथील अल्पवयीन मुलीचे वाय सी कॉलेज येथून अज्ञाताने अपहरण केले आहे.
दुसऱ्या घटनेत शनिवार पेठेत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेत पाटण येथील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
चौथ्या घटनेत म्हसवड येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने राहत्या घरातून अपहरण केल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.