कराड तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन युवती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : कराड तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन युवती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान उत्तर पार्ले, ता. कराड गावच्या हद्दीतून मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृह येथून एक युवती घरी जाणार आहे, असे सांगून कुठेतरी निघून गेली आहे.
दुसऱ्या घटनेत दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान पार्ले तालुका कराड गावच्या हद्दीतून राहत्या घरातून एक 22 वर्षीय युवती कराड येथे जाते असे सांगून राहत्या घरातून निघून गेली आहे.
या दोन्ही तक्रारींची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक बैले करीत आहेत.


