मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 जानेवारी रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन सौ. लता अनिल वायदंडे रा. बनवडी, ता. कराड यांच्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाचे, 26 हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र चोरी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मनोज महादेव बहिरवार रा. अशोक नगर, सांगली आणि ज्ञानेश्वर मधुकर जाधव रा. मोडसांगवी, ता. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर या दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.


