खंबाटकी घाटात कंटनेरला लागली आग, तीन कोटींचं नुकसान
वाहतूक ठप्प; वाहनांच्या सहा ते सात किलोमीटर पर्यंत रांगा
खंबाटकी घाटामध्ये दत्त मंदीर जवळ दुपारी एक वाजता पुढील जाणारा मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने घाटात मागे एम. जी. हेक्टर या महागडया गाड्या घेऊन जात असलेल्या कंटनेरला धडक दिल्याने डिझेल टाकी फुटुन कंटेनरने तत्काळ पेट घेतला. यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये एकुण सहा एमजी हेक्टर गाड्या व कपडयाचे रोल तसेच दोन मालगाड्या असे मिळुन अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.
सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये दत्त मंदीर जवळ दुपारी एक वाजता पुढील जाणारा मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने घाटात मागे एम. जी. हेक्टर या महागडया गाड्या घेऊन जात असलेल्या कंटनेरला धडक दिल्याने डिझेल टाकी फुटुन कंटेनरने तत्काळ पेट घेतला. यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये एकुण सहा एमजी हेक्टर गाड्या व कपडयाचे रोल तसेच दोन मालगाड्या असे मिळुन अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान पोलीस निरीक्षक महेश इंगळे, दत्तात्रय गुरव व प्रकाश घनवट यांनी घटनास्थळी सुत्रे हलवुन तत्काळ एशियन पेन्ट, वाई नगरपरिषद व भुईंज कारखान्याचे अग्निशामक बंब बोलावुन आग विझवली आणि येथील वहातुक बोगद्यामार्गे वळवली. या गाडया विझविण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागला आहे.
याबाबत मिळलेली माहिती अशी, कंटेनर गाडी हे एमजी हेक्टर या सहा महागडया गाड्या घेऊन गुजरात, मुंबई वरून हुबळी कर्नाटक येथे जात होता. तर हरियाना गुडगाव वरून कपड्यांचे बंडल घेऊन बंगलोर च्या दिशेने मालट्रक निघाला होता. यावेळी खंबाटकी घाटामध्ये दत्त मंदीर जवळ दुपारी एक वाजता पुढील जाणारा मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने घाटात मागे एम. जी. हेक्टर या महागडया गाड्या घेऊन जात असलेल्या कंटनेरला धडक दिल्याने डिझेल टाकी फुटुन कंटेनरने तत्काळ पेट घेतला. यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये एकुण सहा एमजी हेक्टर गाड्या व कपडयाचे रोल तसेच दोन मालगाड्या असे मिळुन अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.
अयाज पठाण व शिवशक्ती क्रेन सव्हिस यांनी घटनास्थळी मदत केली. यावेळी पो. नि. महेश इंगळे, सहायक पो. नि. दत्तात्रय गुरव, उपनिरीक्षक प्रकाश घनवट, पोवार, विजय पिसाळ, तात्या फरांदे, गणेश सनस, दत्ता दिघे, गोकुळ बोरसे, सतिश पवार. मनोज गायकवाड, अविनाश डेरे, विजय बागल, कचरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परस्थितीवर नियंत्रण मिळवले.
या अपघातामुळे खंबाटकी घाटापासून ते खंडाळा शहरापर्यंत जवळजवळ सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा खंबाटकी घाटात लागल्या. पुणे वरून सातार्याकडे जाणार्या वाहनांनी लोणंद मार्गे प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांनी केले.


