maharashtra

जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा


मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी दोघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी दोघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत महामार्गावरील दत्तकृपा हॉटेल जवळ सुरज मल्लू कोळी वय 24, रा. विलासपूर, सातारा हे थांबले असता साहिल शिकलगार, भरत उर्फ भऱ्या मोहिते (दोघांचीही पूर्ण नावे माहित नाहीत) दोघेही रा. नागठाणे, तालुका सातारा व इतर दोन अनोळखी व्यक्ती हे तेथे आले व त्यांनी कोळी यांच्या खांद्यावर हात ठेवून तू येथे लघवीला का थांबलास, तुझ्या बापाचा रोड आहे का, तू येथे गाडी का थांबवलीस, असे म्हणून काही कारण नसताना हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण करून तसेच साहिल शिकलगार याने कोळी यांच्या उजव्या हाताच्या खांद्यावर कोयता मारून त्यांना जखमी केले. याचबरोबर कोळी यांच्या जवळ असलेले 25 हजार रुपये पॅन्टच्या खिशातून जबरदस्तीने काढून चोरून नेले आहेत. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले अधिक तपास करीत आहेत.