ळासाहेबांची शिवसेना सातारा शहर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश मोरे यांनी मुद्रीत केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सातारा : बाळासाहेबांची शिवसेना सातारा शहर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश मोरे यांनी मुद्रीत केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. हे प्रकाशन मुख्यमंत्र्यांचे मूळ गाव असणाऱ्या दरे, तालुका महाबळेश्वर येथे करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश शिंदे व सातारा शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
निलेश मोरे यांच्या कल्पकतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक करत सर्वसामान्यांसाठी ही दिनदर्शिका उपयोगी असून वैद्यकीय मदत कक्षाचे असणारे काम या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचणार आहे, असे कौतुक कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. शिवसेना व त्याची मदत कक्षाची इथ्यंभूत माहिती देणारे दिनदर्शिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार, असा मानस यावेळी सातारा शहर प्रमुख व वैद्यकीय मदत पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश मोरे यांनी व्यक्त केला. जनतेला कशी व कोणत्या प्रकारची वैद्यकीय सेवा दिली जाते, याची माहिती या माध्यमातून मिळणार आहे. यासाठी कोणाकडे संपर्क करावा याची माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळणार आहे. गरजू लोकांना या योजनेचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला.


