maharashtra

मंगल कार्यालयातून एक लाख 83 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी


सातारा शहरा नजीक असणाऱ्या एका मंगल कार्यालयातून एक लाख 83 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : सातारा शहरा नजीक असणाऱ्या एका मंगल कार्यालयातून एक लाख 83 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी तीन ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान स्वराज्य सांस्कृतिक भूषण या कोरेगाव रस्त्यावरील मंगल कार्यालयातून अज्ञात चोरट्याने आशा रामचंद्र अनपट रा. अनपटवाडी ता. वाई, शुभांगी धनाजी जाधव रा. शिवराज पेट्रोल पंप सातारा, हेमलता विजय मोरे रा. दुर्गा पेठ सातारा, प्रणिता सागर बर्गे रा. कोरेगाव तालुका कोरेगाव यांचे एकूण 1 लाख 83 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक अवघडे करीत आहेत.