maharashtra

युवतीचा विनयभंग करून दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


युवतीचा विनयभंग करून दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : युवतीचा विनयभंग करून दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खंडाळा गावात राहणारी आणि शिरवळ येथे खाजगी नोकरी करणारी युवती दिनांक 5 जानेवारी रोजी पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान पुणे ते सातारा जाणाऱ्या महामार्गावरील सर्व्हिस रोडने पंढरपूर फाट्याकडे चालत निघाली असताना सौरभ धायगुडे (पूर्ण नाव माहित नाही) रा. शेडगेवाडी, ता. खंडाळा आणि अमित धायगुडे (पूर्ण नाव माहित नाही) रा. वाघोशी, ता. खंडाळा या दोघांनी संबंधित युवतीचा पाठलाग करून कंपनीत कामाला जायचे नाही असे म्हणून दमदाटी केली. तसेच अमित धायगुडे यांनी त्या युवतीच्या चेहऱ्यावरील स्कार्फ ओढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार एस. पी. पंडित करीत आहेत.