शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी-अडचणीच्या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी दुर्लक्ष केले आहे. याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, वडूज, कोरेगाव अशा पाच ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
खा. राजु शेट्टी यांनी कोल्हापूर येथे सुरू केलेल्या आंदोलनाची दखल राज्यशासन घेत नसल्याने त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात चक्का जाम आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.
कोल्हापूर येथे खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महावितरण कंपनीच्या विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा येथील कृष्णानगर येथे असणाऱ्या महावितरण कार्यालयाच्या प्रवेशदाराबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकदिवसीय धरणे आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत वारंवार निवेदन देऊनही त्यावर कोणताही तोडगा होत नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज बुधवारी सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे पंचवीस मिनिटे झालेल्या रास्ता रोको नंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आज साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत साखर वाटून आपला आनंद साजरा केला. येथील सेव्हन स्टार चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली.
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दि. १५ ऑक्टोंबर पासून ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र आज १५ दिवस उलटूनही काही कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही. ही बाब ऊस दर नियंत्रण कायदा १९६६ चा भंग करणारी आहे.
गाईच्या दूधाला दर देण्याच्या मागणीसह दूध उत्पादक शेतकर्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.