कृष्णानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन केली सुटका
कोल्हापूर येथे खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महावितरण कंपनीच्या विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा येथील कृष्णानगर येथे असणाऱ्या महावितरण कार्यालयाच्या प्रवेशदाराबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकदिवसीय धरणे आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
सातारा : कोल्हापूर येथे खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महावितरण कंपनीच्या विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा येथील कृष्णानगर येथे असणाऱ्या महावितरण कार्यालयाच्या प्रवेशदाराबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकदिवसीय धरणे आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
अन्यायकारक वीजबील वसुली,खोटी बीले रद्द करा रद् आणि दिवसा १० तास अखंडीत वीज मिळण्यासाठी खा. राजू शेट्टी यांचे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयाच्या बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला पाठींबा आणि सरकारने नुकताच घेतलेला एफआरपीचे दोन तुकडे करणाऱ्या शासन निर्णयाचा जाहीर निषेध म्हणून सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कृष्णनगर येथील महावितरण कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले होते. यावेळी आंदोलनकर्ते कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडून बसल्याने पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला बसण्याची विनंती केली..मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसानी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची नंतर सुटका केली.
आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, धनंजय महामुलकर, राज्य कार्यकारणी सदस्य अर्जूणराव साळूंखे, सातारा तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ, फलटण तालुका उपाध्यक्ष शकील मणेर, राजु घाडगे, उमेश घाडगे, दत्तात्रय पाटील, सुधाकर केसुगडे, संदीप घाडगे, रणजीत बागल, रामचंद्र मोरे, सुभाष नलावडे, जेष्ठ नेते मूरलीधर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, हेमंत मोरे, जनार्दन आवारे, निलेश भोसले, हेमंत खरात व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.


