लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या आहेत. तर मविआने 30 जागांवर विजय मिळवला आहे. हेच समीकरण विधानसभानिहाय लागू केल्यास आगामी निवडणुकीत मविआ 150 जागा जिंकू शकते.
दैनिक 'सामना'तील अग्रलेखावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना हे सर्व आताच उकरून काढायची गरज काय? असा संतप्त सवाल भुजबळ यांनी केला आहे.
कसबा पेठे मध्ये भाजपच्या पॉवर बँकेने महाविकास आघाडीचा विजय खेचून आणलेला आहे. त्यामुळे वडूज नगरीत फटाक्यांची आतषबाजी करुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नगरपालिकेला पॅनल उभे करणार, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. आज पुणे येथील बारामती हॉस्टेल येथे दीपक पवार यांच्यासोबत बैठक पार पडली.
गेल्या अडीच वर्षात एकही निर्णय शिवसैनिकाच्या न्यायासाठी झाला नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना खाऊन टाकली. शिवसेना पक्ष संपवण्यासाठीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कामे केली असल्याची टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केली.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात इम्पिरीकल डेटा केंद्र शासनाने द्यावयाचा आहे, असे सांगण्यात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष घालवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा त्यांचा डाव होता. विशेषतः यामध्ये महाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी आघाडीवर होता, अशी घणाघाती टीका आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केली.
जर नागरिकांना आणि त्यांच्या कामांना वेळ दिला जात नसेल तर अंर्तगत खदखद वाढणारच. या मतभेदांची कुणकूण कानावर होतीच. राज्यातील महाविकास आघाडीचे पतन झाले, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, अशी थेट प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीवरून दिली आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी सरकार सत्तेचा पाच वर्षाचा कार्यकाल नक्की पूर्ण करणार. भाजपने कितीही राजकीय खेळ्या केल्या तरी महाविकास आघाडी अभेद्यच राहणार असून त्यांची सत्ता जाणार नाही, अशी ठाम ग्वाही इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.
साताऱ्यात शुक्रवारी पोलीस दलाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील दोन मंत्री म्हणजे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आणि सहकारमंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हजेरी लावली. दोघेही एकाच मंचावर आल्याने दोघांनी एकमेकांना चांगलेचं चिमटे काढले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर नगरोत्थान अंतर्गत एक रुपयाचा निधी शहराला प्राप्त झालेला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव असे प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी परखड टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आज सातारा शहरातून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदविला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार दुकाने बंद ठेवण्यात आली होती.