maharashtra

महाविकास आघाडीचे पतन यात आश्चर्य नाही

खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्लीतून प्रतिक्रिया

The collapse of the Mahavikas front is no surprise
जर नागरिकांना आणि त्यांच्या कामांना वेळ दिला जात नसेल तर अंर्तगत खदखद वाढणारच. या मतभेदांची कुणकूण कानावर होतीच. राज्यातील महाविकास आघाडीचे पतन झाले, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, अशी थेट प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीवरून दिली आहे.

सातारा : जर नागरिकांना आणि त्यांच्या कामांना वेळ दिला जात नसेल तर अंर्तगत खदखद वाढणारच. या मतभेदांची कुणकूण कानावर होतीच. राज्यातील महाविकास आघाडीचे पतन झाले, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, अशी थेट प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीवरून दिली आहे.
शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री आणि अन्य आमदारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची चर्चा देशभरात सुरु आहे. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, असे म्हणत उदयनराजे यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.
उदयनराजे भोसले म्हणाले, माध्यमातून जे चित्र दिसत आहे. ते गेले दोन वर्षांपासून सुरु असल्याचे सातत्याने कानावर येत होते. ही खदखद सुरु होती. ज्यावेळेस एका विचाराने एका ध्येयाने प्रेरीत होऊन लोक एकत्र येतात. त्यांना कोणतेही अमिष दाखविण्याची गरज नसती. परंत भिन्न विचारांच्या लोक सत्तेसाठी एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. वेगवेगळी विचारधारेचे लोक एकत्र आले. त्यामुळे त्यांना अमिष दाखवावे लागले.
अन्य पक्षांच्या पक्ष श्रेष्ठींवर मी भाष्य करणार नाही परंतु त्यांनी त्यावेळी एकत्र येताना विचार करायला हवा होता. मुळात हे टिकणार ते किती दिवस टिकणार. लोकांना वेळ दिला जात नाही, पक्ष श्रेष्ठींकडून. काम होत नाही. असे होत असताना स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका लागणार आहेत. या सर्व निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपचे विरोधक कोण आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस. त्यामुऴे ही समीकरण जुळणार नव्हती. ती जुळवली गेली.