महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सातारा शहरातील महामार्गावरील काही इंग्रजी पाट्या लावलेल्या दुकानांना मराठी नावांच्या मुद्द्यावरून पुन्हा काळे फासण्यात आले. हॉटेल प्रीती एक्झिक्युटीव्ह परिसरातील काही दुकानांवर तडक काळे फासण्याची कारवाई सुरू झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही सातारा शहरातील अनेक दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत नाहीत. त्या इंग्रजी अक्षरांमध्ये आहेत. या संदर्भात तातडीने निर्णय व्हावा. अन्यथा व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे.
त्रिभाषा सूत्राप्रमाणे स्थानिक भाषेचाही समावेश असायला हवा होता. ईडी अनेकांना नोटीस धाडते, परंतू मराठी एकीकरण समितीने ईडीला नोटीस धाडून फलकावर मराठी भाषा आणली आणली आहे.
१९८२ पासून मनोरंजन विश्वातील सर्वात अग्रगण्य ''अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट'' तर्फे गुडी पाडव्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म "अल्ट्रा झकास" लॉंच करण्यात आले आहे.
सध्याची नवीन पिढी इंग्रजी शिक्षण घेत असल्यामुळे मराठी वाचनाचे प्रमाण फार कमी झाले असल्याची खंत तारांगण मासिकाचे संपादक जेष्ठ पत्रकार मंदार जोशी यांनी व्यक्त केली.
जेष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके आणि पांडुरंग तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निवडण्यात आलेली खटाव तालुका मराठी पत्रकार परिषद संघाची कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्रातील तमाम जनता मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे हा महाराष्ट्राच्या एकजुटीचा संदेश देण्याची गरज निर्माण झाली असल्यामुळे सभागृहाचे सर्व कामकाज बाजूने ठेवून त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी आज सभागृहात केली.
पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' १५ ऑगस्टपासून परत येत आहे. आठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. काही दिवसांची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जत्रेकरी आता रसिकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत.
सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो.
मी सिनसृष्टीत पदार्पण केल्यानंतर लोक मला काहीही बोलायचे’, असेही तिने यावेळी म्हटलं.
सोनी मराठी वाहिनी नेहमीच नवनवीन विषय हाताळत असते. अशीच एक नवी कोरी मालिका बॉस माझी लाडाची हि मालिका २८ फेब्रुवारी २०२२ पासून दररोज रात्री ८: ३० वाजता सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि नवोदित अभिनेता आयुष संजीव मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत .
'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखला जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचं अभिनय, हटके गाणी आणि समंथा रुथ प्रभूचं आयटम साँग अशा सर्वच गोष्टी चर्चेत आल्या आहेत. 'सामी सामी' आणि 'ऊ अंटावा' या गाण्यांनी धुमाकूळ घातला. आता 'श्रीवल्ली' या गाण्याची एक वेगळीच क्रेझ सोशल मीडियावर पहायला मिळतेय. 'पुष्पा' हा चित्रपट तेलुगूसोबत हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेतरी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या इतर भाषांमध्येही गाणी डब करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे 'श्रीवल्ली' या गाण्याचं मराठी व्हर्जन सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Srivalli song )
मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली.
काल दि. 5 रोजी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सातारच्या कलावंतांनी एकत्र येऊन अत्यंत साध्यापणाने शाहूकला मंदिर येथे मराठी रंगभूमी दिन साजरा केला.
'लार्जर दॅन लाइफ' सेट, दमदार कलाकार, उत्कृष्ट कथानक व दिग्दर्शन यांच्या जोरावर 'बाहुबली'च्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमविला होता. 'बाहुबली : द बिगनिंग' हा चित्रपट एका अशा निर्णायक वळणावर येऊन संपला होता की, संपूर्ण जगाला 'बाहुबली : द कन्क्लुजन' या दुसऱ्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
सोनी मराठी वाहिनीवरील मालिका तू सौभाग्यवती हो ही प्रेक्षकांना आवडू लागली आहे, अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान यांची ही हळुवारपणे फुलत जाणारी प्रेम कहाणी आता रंगू लागली आहे. प्रत्येक मुलीची आपल्या लग्नाला घेऊन काही स्वप्न असतात तशीच ऐश्वर्याची सुद्धा आहेत पण ऐश्वर्याचं हे लग्न चारचौघींसारखं नाही तर आगळंवेगळं आहे. वयाच्या, सामाजिक दर्जाच्या एकंदर सीमा ओलांडून हे लग्न होतं...
‘महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती याचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे, त्याला सर्व मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
‘मराठी भाषेचे आपल्यावर अनंत उपकार असून, या भाषेमुळेच अकरा कोटी मराठी जनतेला जीवनाचा आनंद घेता येत आहे, हजारो वर्षांपासून मराठी भाषेने आपली ज्ञान परंपरा जपली आहे. या भाषेचा गौरव, रक्षण व जतन करणे, हे आपले परम कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
‘आजचे संशोधन हे यूजीसीचा फोर्स, बढती, नियुक्ती आदी कारणांसाठी केले जात असून, संशोधन परंपरेला अस्वस्थ करणारे, असे हे चित्र आहे. ऑनलाईन नियतकालिके, आयएसएसएन, आयएसबीएन अशी गोंडस नावे देऊन आज संशोधन पेपर, पत्रिका काढल्या जात आहेत. एपीआय स्कोअर जास्त होण्यासाठी केवळ संशोधन पेपर लिहिले जातात. खेळाडू जसे धावा काढून स्कोअर वाढवतात, तसे हे आहे. संशोधनातील नैतिकता यात हरवून गेली आहे. भाषा कोणती रूपे धारण करते आहे, याकडे संशोधकांचे लक्ष नाही.अशावेळी ज्यांनी कोणत्याही लाभाची अपेक्षा केली नाही, अशा संशोधन कर