maharashtra

सातारच्या कलावंतांनी एकत्र येऊन अत्यंत साध्यापणाने साजरा केला मराठी रंगभूमी दिन


Artists from Satar came together and celebrated Marathi Theater Day with great simplicity
काल दि. 5 रोजी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सातारच्या कलावंतांनी एकत्र येऊन अत्यंत साध्यापणाने शाहूकला मंदिर येथे मराठी रंगभूमी दिन साजरा केला.

सातारा : काल दि. 5 रोजी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सातारच्या कलावंतांनी एकत्र येऊन अत्यंत साध्यापणाने शाहूकला मंदिर येथे मराठी रंगभूमी दिन साजरा केला.
मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने सातार्‍यातील शाहूकला मंदिर येथे सातारचे कलावंत एकत्र आले. सुरुवातीला सर्व रंगकर्मींनी रंगमंचाचे तसेच नटराज मूर्तीचे पूजन केले. यावेळी शशांक वाडेकर यांनी प्रास्ताविक करताना कोरोनाचं दुष्टचक्र लवकरच संपेल आणि सगळं पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. 
आनंद कदम यांनी लवकरच  शाहूकला मंदिरात चांगलं व्यावसायिक नाटक आणण्याचे आश्वासन दिले. बाळकृष्ण शिंदे यांनी दुरुस्तीची कामे लवकरात लवकर संपवून रंगमंदिर प्रेक्षकांसाठी खुले व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अभिषेक परदेशी, राजेश मोरे, मकरंद गोसावी या रंगकर्मींनी सगळ्यांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मंदार कोल्हटकर यांनी जगदीश पवार यांच्या चेष्टा या एकांकिकेतील एका प्रवेशाचे वाचन केले. तर महेश चव्हाण व उदय बाबर या रंगकर्मींनी कविता वाचन केले. प्रसाद नारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
यावेळी आनंद कदम, मंदार कोल्हटकर, विकास बनकर, राजेश मोरे, मनोज जाधव, आकाश निंबाळकर, अभिषेक परदेशी, उदय जाधव, विजयसिंह राजपूत, बाळकृष्ण शिंदे, शशांक वाडेकर, मकरंद गोसावी, गणेश वाघ, प्रसाद नारकर, गुरुनाथ जाधव, सुनील रणदिवे, महेश चव्हाण, उदय बाबर, दिलीप हर्डीकर, सदानंद बकरे हे रंगकर्मी व रंगमंदिर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कलाकारांनी असेच एकत्र येऊन विविध प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत. अशा उपक्रमामुळे सर्वसामान्य कलाकारांना यामधून प्रेरणा मिळून कला क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल. सातारा हे रंगकर्मींसाठी एक चांगले व्यासपीठ आहे. सातारच्या या मातीतून अनेक दिग्गज कलाकार निर्माण झालेले आहेत. मराठी रंगभूमी दिनानिमित्त सर्व कलावंताना शुभेच्छा...
- महारुद्र तिकुंडे 
(माहिती अधिकार) संस्थापक-अध्यक्ष पंचम टेलिव्हिजन अँड ब्रॉडकास्टिंग नेटवर्क को-ऑप संस्था लि. सातारा.