'लार्जर दॅन लाइफ' सेट, दमदार कलाकार, उत्कृष्ट कथानक व दिग्दर्शन यांच्या जोरावर 'बाहुबली'च्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमविला होता. 'बाहुबली : द बिगनिंग' हा चित्रपट एका अशा निर्णायक वळणावर येऊन संपला होता की, संपूर्ण जगाला 'बाहुबली : द कन्क्लुजन' या दुसऱ्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
मुंबई : 'लार्जर दॅन लाइफ' सेट, दमदार कलाकार, उत्कृष्ट कथानक व दिग्दर्शन यांच्या जोरावर 'बाहुबली'च्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमविला होता. 'बाहुबली : द बिगनिंग' हा चित्रपट एका अशा निर्णायक वळणावर येऊन संपला होता की, संपूर्ण जगाला 'बाहुबली : द कन्क्लुजन' या दुसऱ्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जो विक्रम रचलाय, तो अद्याप कोणत्याही चित्रपटाला मोडता आला नाही. हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील इतिहासातला एक सोनेर पान आहे.
आता हेच सोनेरी पान तुम्हाला मराठी भाषेत पाहता येणार आहे. होय, लवकरच 'बाहुबली' चित्रपट मराठीत येतोय. चला तर बघुया मराठी बाहुबली ला कोणाचा आवाज मिळाला आहे ते. मराठमोळ्या 'बाहुबली'ची संपूर्ण जबाबदारी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे सांभाळत आहेत.
डॉ. अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला आहे. विशेष म्हणजे देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. त्यासोबतच मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस यासारख्या दिग्गज कलाकारांनी बाहुबालीमधील इतर पात्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
तर दुसरीकडे 'आदर्श शिंदे, बेला शेंडे, अवधूत गुप्ते, केतकी माटेगावकर आणि मुग्धा कऱ्हाडे' यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. या मराठमोळ्या बाहुबलीसाठी कलाकारांची भली मोठी फौज काम करताना दिसणार आहे. 'बाहुबली' दिवाळीच्याशुभमूर्तावर गुरुवार 4 नोव्हेंबरला प्रक्षेपित होणार आहे.