‘गेल्यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवलं होत. त्यावेळी हा अनुभव पूर्णपणे नवा होता. अनपेक्षित शत्रूशी दोन हात करत असताना शासकीय यंत्रणा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळाले होते. आपल्यावर पुन्हा एकदा तीच वेळ आली असून स्थानिक प्रशासन, नागरिकांनी कोरोनाबद्दल संवेदनशील राहून कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे,’ असे मत आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
‘खटाव तालुक्यात दररोज सरासरी किती नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. सद्य:स्थितीतील उपाययोजना, उपलब्ध साधन सामग्री याचा आरोग्य विभाग व प्रशासनाने रोजच्या रोज आढावा घ्यावा. तसेच रुग्ण व नातेवाइकांची इतर ठिकाणी होणारी धावपळ कमी करण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
‘कोविड लसीकरणासाठी रजिट्रेशन करणे महत्त्वाचे आहे, अजूनपर्यंत तरी लसीकरणासाठी रजिट्रेशन करण्याची टक्केवारी कमी आहे. लस संपली म्हणून कर्मचार्यांनी न थांबता लसीकरणासाठी शंभर टक्के रजिस्ट्रेशन केलेच पाहिजे, असे म्हणत ‘हागणदारी मुक्त गाव’ या अभियानासारखे ‘कोरोनामुक्त गाव’ असे फलक गावाबाहेर लागावेत,’ अशी आशा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी व्यक्त केली.
‘जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.
‘सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवा,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.
‘जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्व यंत्रणांनी कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
‘राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपापयोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे,’ अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दि. 20, 21 व 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
‘राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे,’ असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.