आपणाला जो प्रश्न समाजापुढे मांडायचा व सांगायचा आहे तो शब्दात सांगणं खूप सोप्प परंतु पडद्यावर दाखवन तितकंच अवघड हे अवघड काम नागराज ने फॅन्ड्री ,सैराट, नाळ नंतर थेट बॉलिवूडमधील झुंड मध्ये करून दाखवले आहे.
मुंबई पुणे अशा मोठमोठ्या महानगरांमधुनच टायलेंट बाहेर पडत हा दावा खोडण्यात झुंड यशस्वी ठरला आहे. भारत हा एवढा मोठा देश आहे तरीपण आपण ऑलम्पिक मध्ये इतर देशांच्या तुलनेत खूपच मागे पडतो . कारण आपण तळागाळापर्यंतच टायलेंट शोधत नाही आपण सुद्धा आपल्या आसपासचे व आपल्यापेक्षा खालच्या समाजातले एखाद्या व्यक्तीचे टॅलेंट दिसलं तरी ते जाणून बुजून दुर्लक्षित करतो परंतु आपण खरंच जात-पात गट-तट उच्च नीच हा भेदभाव सोडला तर एक खूप सुंदर असं टायलेंट जगाला देऊ शकतो हा सांगण्याचा प्रयत्न म्हणजे अमिताभ व नागराज मंजुळे यांचा झुंड....
आपणाला जो प्रश्न समाजापुढे मांडायचा व सांगायचा आहे तो शब्दात सांगणं खूप सोप्प परंतु पडद्यावर दाखवन तितकंच अवघड हे अवघड काम नागराज ने फॅन्ड्री ,सैराट, नाळ नंतर थेट बॉलिवूडमधील झुंड मध्ये करून दाखवले आहे. झुंड ची कथा दोन चार ओळीत मांडणयासारखी आहे परंतु ती वाचण्यापेक्षा पडद्यावर बघण्याची जी मजा आहे ती सांगण्यात नाही
झुंड ची कथा सांगण्यासाठी नागराज ने फुटबॉल चा वापर केला आहे त्याऐवजी तो आणखी कशाचाही वापर करू शकला असता तरी देखील कथेला धक्का लागला नसता अनेकांना वाटेल की झुड मध्ये फुटबॉलचे स्पर्धा दाखवली आहे की काय परंतु ती नाममात्र दाखवली आहे व त्यासाठी दुर्लक्षित असा झोपडपट्टीमधील समाज हा दाखवला आहे झोपडपट्टी हे याचं प्रतिनिधित्व करते की दुर्लक्षित व नेहमी आपण आपल्या पेक्षा खालचा समजतो तो !
मग झोपडपट्टी दाखवायची म्हटल की त्यातील सर्व बारकावे दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी नागराजने आपल्या स्टाईलने कलाकार उभे केले आहेत. सैराट व फॅन्ड्री मधील त्याचे कलाकार आर्ची परश्या व अन्य कलाकार त्यांनी या चित्रपटात घेतले आहेत परंतु मुख्य कलाकार म्हणून अमिताभ यांची निवड करताना त्यांनी खूप विचार केलेला जाणवत आहे ऐंशीव्या वर्षी अमिताभ चा अभिनय पाहताना या माणसाला अभिनयाचे विद्यापीठ का म्हणतात हे लक्षात येते शेवटच्या पंधरा मिनिटात न्यायालयात अभिताभ बच्चन ने केलेली संवाद फेक पाहताना मन सुन्न होऊन जाते व या संवाद फेकीत अमिताभ झुंडचा सर्व अर्थ सांगून जातो या संवाद फेकीला प्रेक्षकांचाही मिळणारा प्रतिसाद पाहता प्रेक्षकांनाही झुंड भावून जातो हे कळते
अमिताभच्या अभिनया समोर मुलांनीही तितकाच जोरदार अभिनय केल्यामुळे प्रेक्षक चित्रपटाशी खिळुन राहतो अजय अतुल चे ताकतीचे संगीत व वाकडातिकडा हे गाण लोकप्रिय झाल आहे. नागपुर मधील दाखवलेली झोपडपट्टी व एकंदरीत वातावरण हे आपल्याला प्रत्यक्ष त्या परिस्थितीत घेऊन जाते एवढे सुरेख चित्रण करण्यात आले आहे विजय बोराडे या फुटबॉल कोचने जे प्रत्यक्ष करून दाखवले त्याला पडद्यावर मांडताना नागराज व अमिताभ यांनी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे मुलांची संवादफेक व डायलॉग बाजी देखील झकास झाली आहे
सुरुवातीला हातात सुरा ,चाकु साखळ्या घेऊन फिरणारी मुलं व शेवटी हीच मुलं सुटाबुटात विमानात बसून झोपडपट्टीवरून जाताना दाखवलेले विमाश हे प्रेक्षकांच्या मनाला भिडुन जाते एकंदरीतच झुंड पाहिल्यावर समजतील झुंड आपल्या आसपास आहे हे कळत नकळत आपल्यालाही जाणवल्याशिवाय राहात नाही आणि हीच नागराज मंजुळे व अमिताभ बच्चन यांची ची ताकत आहे