पूजा हेगडे लवकरच प्रभासबरोबर ‘राधे शाम’मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय दक्षिणेतील स्टार थलपती विजयबरोबर ती एका सिनेमातही असणार आहे. अर्थात या दोघांच्या एकत्रित सिनेमाची अद्याप अधिकृतपणे घोषणा केली गेलेली नाही.

या सिनेमाचे शीर्षकदेखील अद्यापनिश्चित झालेले नाही. हा सिनेमा थलपती विजयचा 65 वा सिनेमा असणार आहे. म्हणून सध्या तरी या सिनेमाला विजय 65 म्हणूनच संबोधले जात आहे. प्रभासबरोबर काम केल्यामुळे आता पूजाची ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढली आहे. तिने आपल्या मानधनामध्ये वाढ केली आहे. आता ती एका सिनेमासाठी 2.5 कोटी रुपये मानधन घेणार आहे. प्रभासबरोबरचा ‘राधे शाम’ हा पूजा हेगडेचा दक्षिणात्य सिनेमातील 8 वर्षांनंतर पुनरागमन करणारा सिनेमा आहे.
पूजाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवातच दक्षिणात्य सिनेमांमधूनच केली होती. हिंदीमध्ये जम बसवण्यापूर्वी दीर्घकाळ ती दक्षिणेतच सक्रिय होती. यापूर्वी अल्लू अर्जुन बरोबर ‘वैकुंठपुरमलो’मध्ये पूजाने काम केले होते. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर तिच्या वाट्याला ‘राधे शाम’ आणि ‘सर्कस’ची ऑफर आली. आता वाढीव मानधनाच्या आधारे ती दक्षिणेबरोबरच हिंदीमध्येही जबरदस्त परफॉमन्स देण्याची तयारी करत आहे.