sports

सातारा पोलिसांना 24 वाहने व 48 दुचाकी ना. बाळासाहेब पाटील यांनी केली सुपूर्द


जिल्हा नियोजनच्या निधीतून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन देण्यात आले आहे. विविध प्रकारची 24 वाहने आणि 48 मोटारसायकली यांच्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होणार  आहे. जिल्हा नियोजन निधीमधून पोलीस विभागासाठी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ही वाहने पोलीस विभागाला पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. 

सातारा : जिल्हा नियोजनच्या निधीतून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन देण्यात आले आहे. विविध प्रकारची 24 वाहने आणि 48 मोटारसायकली यांच्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होणार  आहे. जिल्हा नियोजन निधीमधून पोलीस विभागासाठी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ही वाहने पोलीस विभागाला पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. 

याप्रसंगी गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी उपस्थित होते.

पोलीस विभागातील अनेक वाहने जुनी झाली होती. जिल्हा नियोजनच्या निधीमधून 13 स्कॉर्पिओ, 5 बलोरो, 6 व्हॅन व 48 मोटारसायकली पोलीस विभागास देण्यात आली आहेत. या वाहनांचा बंदोबस्तासाठी मोठा उपयोग होणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मिदत मिळणार असल्याचेही पालकमंत्री ना. पाटील यांनी यावेळी सांगितले.

पोलीस विभागातील वाहने जुनी झाली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा नियोजनमधून साडेतीन कोटी रुपये वाहनांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. या वाहनांचा पोलीस विभागामार्फत योग्य उपयोग करून पोलिसांमधील कार्यक्षमता व गतीमानता वाढणार असून, हा निधी मंजूर केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे आभार गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी मानले.