जिल्ह्यात दिवसभरात 268 कोरोनाबाधित
बुधवारी 18 बाधितांचा मृत्यू : 385 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 42,698
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 268 बाधितांची नोंद झाली असून, 18 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 385 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 268 बाधितांची नोंद झाली असून, 18 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 385 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 385 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 385 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
594 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 54, कराड 16, फलटण 19, कोरेगाव 50, खंडाळा 55, रायगाव 82, पानमळेवाडी 132, महाबळेश्वर 10, दहिवडी 10, पाटण 9, खावली 33, तळमावले 21 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 56 अशा एकूण 594 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


