सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज 500 ते 600 रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. रविवारीदेखील 489 कोरोनाबाधित आढळले आहेत तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13,997 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज 500 ते 600 रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. रविवारीदेखील 489 कोरोनाबाधित आढळले आहेत तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13,997 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात आणखी 99 जण कोरोनामुक्त
यामध्ये जावली तालुक्यातील 12, कराड 7, खंडाळा 26, खटाव 2, कोरेगाव 3, महाबळेश्वर 3, माण 5, पाटण 2, सातारा 20, वाई 19 अशा एकूण 99 जणांचा कोरोनामुक्त समावेश आहे.
255 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 16, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 35, खंडाळा 50, रायगाव 44, मायणी 70, महाबळेश्वर 40 अशा एकूण 255 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.


