sports

जिल्ह्यात दिवसभरात 716 कोरोनाबाधित

शुक्रवारी 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू : 855 जणांची कोरोनावर मात; एकूण रुग्णसंख्या 22, 863

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात 716 जण कोरोना पॉझिटिव्ह आले तर 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरात 855 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात 716 जण कोरोना पॉझिटिव्ह आले तर 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरात 855 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 

जिल्ह्यात 855 जण कोरोनामुक्त
 जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 855 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 1162 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

1162 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 50, उपजिल्हा रुग्णालय, कराड 20, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 85, कोरेगाव 73, वाई 103, खंडाळा 160, रायगाव 3,  पानमळेवाडी 141, मायणी 100, महाबळेश्‍वर 60, पाटण 14, दहिवडी 50, खावली 90, तळमावले 26 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 187 अशा एकूण 1162 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.