sports

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 235 जण कोरोनाबाधित

उपचारादरम्यान 12 जणांचा मृत्यू ः एकूण रुग्णसंख्या 47,404

सातारा ः सातारा जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 235 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर उपचारादरम्यान 12 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या एकूण रुग्णसंख्या 47,404 इतकी असली तरी 43104 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 424 नागरिकांना घरी सोडण्यात आले. बुधवारी दुपारपर्यंत उपचार घेणारे केवळ 2485 उरले होते. रात्री उशिरा त्यात 235 जणांची भर पडली आहे. 

336 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 14, कराड येथील 17, फलटण येथील 15, कोरेगांव येथील 18, वाई येथील 11, खंडाळा येथील 21, रायगांव येथील 41, पानमळेवाडी येथील 54,  मायणी येथील 17, महाबळेश्‍वर येथील 10, पाटण येथील 13, दहिवडी येथील 5, खावली येथील 9, तहमावले येथील 18, म्हसवड येथील 16 व  कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 57 असे एकूण 336 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.