sports
जिल्ह्यात आणखी 469 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
रविवारी 19 बाधितांचा मृत्यू : 513 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 35,881
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 469 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे, तर आज 19 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 469 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे, तर आज 19 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात दिवसभरात 513 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 513 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
181 जणांचे स्त्राव तपासणीला
जिल्ह्यात रविवारी फलटण येथील 52, खंडाळा 58, रायगाव 49, पानमळेवाडी 17, महाबळेश्वर 5 अशा एकूण 181 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


