जिल्ह्यात दिवसभरात 78 कोरोनाबाधित
सोमवारी 5 बाधितांचा मृत्यू : 207 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 51,225
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 78 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 207 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 78 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 207 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 207 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 207 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
332 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 17, कराड 25, फलटण 17, कोरेगाव 9, वाई 20, खंडाळा 16, रायगाव 8, पानमळेवाडी 30, मायणी 8, महाबळेश्वर 1, पाटण 3, दहिवडी 17, खावली 16, तळमावले 13, म्हसवड 21, तरडगाव 39 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 72 अशा एकूण 332 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.