सातारा जिल्ह्यात संसर्ग वेगाने फैलावत असल्याने रुग्णसंख्या दहा हजारांच्या दिशेने वेगाने सरकू लागली आहे. बुधवारी आणखी 396 नव्या बाधितांची भर पडली असून 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात संसर्ग वेगाने फैलावत असल्याने रुग्णसंख्या दहा हजारांच्या दिशेने वेगाने सरकू लागली आहे. बुधवारी आणखी 396 नव्या बाधितांची भर पडली असून 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात बनपुरी (ता. खटाव) येथील 79 वर्षीय पुरुष, अपशिंगे (ता. सातारा) येथील 70 वर्षीय पुरुष, दौलतनगर (सातारा) येथील 36 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, शिंगणवाडी (ता. कराड) येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय महिला, एकंबे (ता. कोरेगाव) येथील 81 वर्षीय पुरुष, ओंड (ता. कराड) येथील 65 वर्षीय पुरुष, मायणी (ता. खटाव) येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण नऊ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
209 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 209 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. यामध्ये जावली तालुक्यातील 7, कराड 41, खंडाळा 47, खटाव 16, कोरेगाव 12, महाबळेश्वर 1, माण 6, पाटण 10, फलटण 7, सातारा 38, वाई 24 अशा एकूण 209 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.
596 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 10, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 59, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 80, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 31, कोरेगाव 5, वाई 81, खंडाळा 26, रायगाव 69, मायणी 101, महाबळेश्वर 63, पानमळेवाडी 8, पाटण 14, खावली 49 अशा एकूण 596 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.


