मोदी सरकारचा हुकुमशाही व भ्रष्ट कारभाराचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने निदर्शने करत निषेध करण्यात आला.
सातारा : मोदी सरकारचा हुकुमशाही व भ्रष्ट कारभाराचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने निदर्शने करत निषेध करण्यात आला.
भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपने राहुलजींविरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने गुरुवारी खा. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या या षडयंत्राविरोधात जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी जिंदाबाद जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, मोदी हटाव देश बचाव, राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी धनश्री महाडिक, छायादेवी घोरपडे, अन्वरपाशा खान, दत्तात्रय धनवडे, रफिक बागवान, जगन्नाथ कुंभार, संदीप माने, श्रीकांत चव्हाण, विजय मोरे, तानाजी शिंदे, आनंदराव जाधव, संभाजी उतेकर, सुरेश कुंभार, जयंतीलाल तपासे, दिलावर पैलवान आदी उपस्थित होते.