sports

सांगली जिल्ह्यात आज 12 मृत्यू, तर नव्याने 366 रुग्ण,

मनपा व जिल्ह्याची रुग्णसंख्या 6 हजार 159 वर पोहचली

शिराळा : सांगली-मिरज-कुपवाड मनपा क्षेत्रात 3 हजार 714 रुग्णसंख्या झाली आहे. सांगली जिल्ह्यात शनिवारच्या अहवालानुसार 12 मृत्यू झाले आहेत. त्याप्रमाणे 366 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आजअखेर एकूण पॉझिटिव पैकी 3 हजार 193 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 6 हजार 159 वर पोहोचली आहे. आज अखेर 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज उपचारा खाली 2 हजार 753 रुग्ण आहेत. शनिवारी rt-pcr टेस्ट 871 घेण्यात आल्या पैकी 316 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.अँटीजन टेस्ट 709 घेण्यात आल्या पैकी 64 पॉझिटिव आढळून आले. तालुका निहाय आजची पॉझिटिव्ह संख्या पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी 13, जत 10, कडेगाव 25, कवठेमहांकाळ 16, खानापूर 7, मिरज 40,पलूस 8,शिराळा 15,तासगाव 14, वाळवा 22, सांगली 172, मिरज 24 असे आहेत. शनिवारच्या अहवालातील मृतांमध्ये सांगली येथील 50, 65, 79, 38, 70 वर्षांचे पुरुष, आणि 60 वर्षांची महिला. कुपवाड येथील 75 वर्षांची महिला. तासगाव येथील 75, 82 वर्षांचे पुरुष आणि 70,वर्षांची महिला. मिरज येथील 75 वर्षांचा पुरुष आणि 61 वर्षांची महिला असा समावेश आहे. आज अखेरची तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे आटपाडी 256. जत 230,कडेगाव 145, कवठेमहांकाळ 214, खानापूर 114, मिरज 520,पलूस 206, शिराळा 268,तासगाव 196,वाळवा 296,मनपा 3714, असे आहेत आज सांगली जिल्ह्यातील 123 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.