sports

शिवशाहीच्या पाच बस जळून खाक

सातारा बसस्थानकातील घटना; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट; जीवितहानी टळली

येथील बसस्थानकामध्ये शेजारीशेजारी उभ्या असलेल्या शिवशाहीच्या एका बसला अचानक आग लागली. त्यानंतर ही आग पेटत जावून पाचही गाड्यांनी पेट घेतला. काही वेळातच धडाडून पेटलेल्या पाचही गाड्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाले आहे. सुदैवाने काही जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस चौकशी करत आहेत. या आगीमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

सातारा : येथील बसस्थानकामध्ये शेजारीशेजारी उभ्या असलेल्या शिवशाहीच्या एका बसला अचानक आग लागली. त्यानंतर ही आग पेटत जावून पाचही गाड्यांनी पेट घेतला. काही वेळातच धडाडून पेटलेल्या पाचही गाड्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाले आहे. सुदैवाने काही जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस चौकशी करत आहेत. या आगीमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

सातारा बससस्थानकामध्ये शिवशाहीच्या पाच बस सातारा शहर बसस्थानकाच्या समोर उभ्या करण्यात आल्या होत्या. सायंकाळी 5च्या सुमारास एका बसला अचानक आग लागली. ती आग लागल्याचे समजाताच जवळच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी होते. या कर्मचार्‍यांनी तत्काळ धाव घेवून अग्निशामक दल आणि हॉटेलमधील कर्मचार्‍यांना माहिती देवून पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच शेजारी-शेजारी उभ्या असलेल्या 5 ही बसेसनी पेट घेतला. त्यामुळे बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली. 

पंधरा मिनिटानंतर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या बसस्थानकात दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशामक दलाने पाण्याचे फवारे मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत पाचही गाड्या अक्षरक्षः जळून खाक झाल्या होत्या. पोलिसांनी ही आग कशी लागली यासाठी आजूबाजूचे हॉटेल आणि प्रवाशांकडे चौकशी सुरू केली. मात्र, आगीचे कारण समोर आले नाही. आग लागल्यामुळे बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.